Nitesh Rane Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला वाईट दिवस आलेत अशी खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे बोलताना व्यक्त केली. आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाटी बदलावी लागेल, तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिपण्णी सुद्धा राणे यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
  
  
  
  








 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



