“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असं वक्तव्य मराठी साहित्य संमेलनात केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे अडचणीत सापडल्या आहेत. असं असतानाच आता ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हेंवर मोठा आरोप केला आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा खुलासा नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला आहे.