गुजरातमधून कपड्याची वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रकला छत्रपती संभाजी नगरजवळ आग लागल्याची घटना घडली. धुळे-सोलापूर महामार्ग येथील फतियाबाद गावाजवळ ही घटना घडली. गुजरातहून कापड घेऊन आलेल्या १४ टायर ट्रकने धावत्या स्थितीमध्ये अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक संपूर्ण जळून खाक झाला, मात्र सुदैवाने ड्रायव्हर आणि क्लिनरने ट्रकमधून उड्या मारल्याने ते थोडक्यात बचावले.