Pune: पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोत धक्कादायक घटना घडली आहे. डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. अशातच आता पुणे पोलिसांनी आरोपीला शोधून देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. याबद्दल पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी माहिती दिली आहे.