Pune: पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती.या घटनेतील आरोपीचा शोध १३ पथकांच्या माध्यमांतून घेतला जात होता,पण अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.
 
  
  
  
  
  
  
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 





 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  