Ajit Pawar Reaction On Pune Rape Case: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे.