Sudha Dwivedi TC With Central Railway: मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांना पकडून कारवाई करण्याचा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रुबिना इमामदार या तिकीट तपासनीसांनी १५० विनातिकीट प्रवाशांना पकडून सर्वाधिक प्रवासी पकडण्याचा विक्रमावर नाव कोरले होते. मुख्य तिकीट तपासनीस सुधा द्विवेदी यांनी २८ फेब्रुवारी रोजी तिकीट तपासणी सुरू केली. सकाळी ६.४८ वाजता खारघर येथून सुरू केलेली तपासणी ३.३० पर्यंत सुरू ठेवली. सरासरी दर दोन मिनिटांनी एका प्रवाशाची तिकीट तपासणी त्यांनी केली. २०२ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करीत त्यांनी ५५,२१० रुपयांचा दंड वसूल केला.