Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी व पीडितेचे शारीरिक संबंध हे सहमतीने झालेले होते असा दावा करत आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. त्यानंतर आरोपीच्या म्हणजेच दत्तात्रय गाडे याच्या भावाने सुद्धा पीडितेने पैसे घेतले असल्याचं म्हणत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावरून आता पीडितेची बाजू मांडत सुषमा अंधारे यांनी काही संतप्त सवाल केले आहेत. राज्य महिला आयोगासह, पोलिसांना सुद्धा लक्ष्य करत अंधारे नेमकं काय म्हणाल्या हे पाहूया..


















