गुहागर येथील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्याची घोषणादेखील केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.