तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कलम १०६(१) नुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा नोंदवल्याने घैसास यांच्या अडचणीत भर पडली आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा दुसरा अहवाल समोर आला आहे. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. सुश्रुत घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.