नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या बोरीचीवारी गावात पाणीटंचाईचं संकट इतकं तीव्र आहे की महिलांना पाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतो. रोज हंडाभर पाण्यासाठी गावातील महिला आणि मुलांना दोन ते अडीच किलोमीटर पायी चालत पाणी आणावं लागतं, नाशिकमध्ये दुष्काळाची परिस्थिती ही भयावह आहे, पण अजूनही प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र समोर येत आहे