‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं’, असं वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेनंतर आता नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण केवळ लोकांच्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या. आम्ही असंवेदनशील नाही, असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ क्लिपही दाखवली.