Devendra Fadnavis: गुरुवारी (२४ एप्रिल) दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. पण या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाच्या नेते गैरहजर होते. अशातच याबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.