Omar Abdullah: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, याचा निषेध केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. राज्य विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.
 
   
   
   
  










 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  