पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून सकाळी सात वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. बाबा भोलेनाथांच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली आहे.