Pramod Sawant: गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनेचा आढावा घेतला असून चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या घटनेबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे.