संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५.३३ टक्के मिळाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीचं फोनवर कौतुक करत अभिनंदनही केलं. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झाली. आता आणि इथून पुढे पाठीवर कौतुकाची देण्यासाठी वडील नसतील याची खंत वाटते, असं वैभवी म्हणाली.