जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. ७ मे रोजी हा सराव होणार आहे. महाराष्ट्रात हा सराव कुठे होणार? गृहमंत्रालयाचे निर्देश नेमके काय? याविषयी जाणून घेऊ