राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल (रविवारी) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सचिन वनजे हे जम्मू काश्मीरमध्ये दरीत लष्कराच वाहन कोसळून शहीद झाले. अजित पवारांनी शहीद जवान सचिन वनजे यांच्या पत्नी आणि आई-वडिल यांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसंच राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासनही दिलं.