भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्त्री करून दोन्ही देशांत शस्त्रविराम जाहीर केला. त्यावरून भारतात सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद
पवार यांनी देखील याबाबत भाष्य केलं. तसंच इंदिरा गांधीच्या काळात झालेल्या शिमला कराराचीही आठवण करून दिली.