Pune: पुण्यातील बिबवेवाडी भागातील शरद पवार गटाचे पर्वती विधानसभा मतदार संघाचे अर्बन सेल विभागाचे अध्यक्ष अमोल परदेशी यांनी माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर,बिबवेवाडी पोलीस स्टेशन आणि पीएमपीएमएलच्या बसमध्ये जाऊन अप्पर इंदिरा नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, या मागणीसाठी खांद्यावर खुर्ची बांधून,अंगाला चिखल लावून भीक मागो आंदोलन केले. त्यांच्या भीक मागो आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.