Mumbai, Pune, Baramati Rain Update: मुंबई पुण्यात पावसाने आज सकाळपासून जोरदार हजेरी लावली असून यंदा कित्येक वर्षात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन राज्यात झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक समस्यां सुद्धा उद्भवत आहेत. मुंबई लोकल तर पुण्यातील रस्त्यांवरील वाहतूक बऱ्याच अंशी ठप्प आहे. अशातच आता पुढील दोन- तीन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी याविषयी दिलेली सविस्तर माहिती पाहूया.