मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना मंगळवारी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या कामाची दखल घेऊन पद्मश्रीने सन्मानित केल्याबद्दल अशोक सराफ यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच आता जबाबदारी वाढली असल्याचंही ते म्हणाले.