Manikrao Kokate: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिकमध्ये पाहणी करत असताना माणिकराव कोकाटे यांनी “ढेकळांचे पंचनामे करायचे का?, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठली. यानंतर अखेर कृषीमंत्री कोकाटे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या शब्दाचा वेगळा अर्थ घेतल्याचं कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.












