IPL 2025 Full Prize Winner List: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. गेल्या १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान फायनल जिंकल्यानंतर, विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंना किती रक्कम मिळाली? जाणून घ्या.