Sudhakar Badgujar Reacts as expelled from Shiv Sena UBT : नाशिकमधील शिवसेना (ठाकरे) नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिवसेनेने (ठाकरे) मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने (ठाकरे) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. नाशिकमधील शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, या हकालपट्टीबाबत बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पक्षातंर्गत बाबींवर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा नाही. तरीदेखील पक्षाला अशी कारवाई करायची असेल तर त्यावर काय बोलणार?