शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीदेखील एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. याबद्दल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. कोणतीही चर्चा चालू नाहीय. प्रसार माध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसत आहे. त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमं दोन्ही पक्ष एकत्र यावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, असं मिश्कील भाष्य जयंत पाटलांनी केलं.