Air India Flight Crashes near Ahmedabad : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.