Air India Plane Crash One Passenger survived: देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तंतोतंत लागू व्हावी असा अनुभव घेतलाय रमेश विश्वास कुमार या ४० वर्षीय व्यक्तीने. अहमदाबाद मध्ये जिथे २४१ प्रवाशांसाठी एअर इंडियाचं विमान काळ ठरलं तिथे तो एकटा वाचला. का, कसा, कशामुळे या सगळ्या प्रश्नांची ठोस उत्तरं नसली तरी त्याचा विमानातून कोसळून रुग्णवाहिकेपर्यंत चालत जातानाचा व्हिडीओ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नक्कीच नाही. इतकंच नव्हे तर याच रमेश विश्वास कुमारने अपघाताच्या नंतर चक्क माध्यमांशी संवाद साधून त्यांना काय झालं याचीही माहिती दिलीये. त्याने नेमकं काय सांगितलं हे आपण या व्हिडिओत पाहूया.