केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारं हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते. आम्ही या प्रकरणी अधिक माहितीची वाट पाहत आहोत,” असं उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितलं. मृतांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.