इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल त्यांची आवश्यक असणारी कामं पावसाळ्याआधी होणं अधिक गरजेचं आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं आहे. मात्र या पुलाच्याबाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तसंच ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणीही केलेली. मात्र लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं, असा आरोपही त्यांनी केला.