कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सामान्यांसह विरोधकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत सरकारला थेट जाब विचारला आहे.