दुसऱ्या मुलासोबत का बोलते? या कारणावरून संतापाच्या भरात एका मुलीला भर रस्त्यात काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरातून समोर आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मारहाण करणारा मुलगा आणि मारहाण झालेली मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत.