“जे आपला बाप बदलतात. ज्यांना राजकारणात पोरं होत नाही. अशी लोकं जेव्हा आपल्या घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा त्यांची कीव येते”, अशी जहरी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गुरुवारी शिवसेनेच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.