राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी (24 जून) मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मात्र या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून अजित पवारांची भेट घेण्यात आली. तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले आहे.