भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात गावातील टीका करणाऱ्यांवर पातळी सोडून टीका केली. भर कार्यक्रमात कुचरवट्यावर टवाळकी करणारे दहा-बारा कार्टी, असा उल्लेख करत बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्यांवर भाष्य करत वादग्रस्त विधाने केली. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल सरकारने दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. त्यांच्या विधानावरुन चौफेर टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे विधान चुकीचे असल्याचे म्हणत लोणीकर यांनी समज देणार असल्याचे म्हटलं. त्यानंतर आता लोणीकरांनीही यावर स्पष्टीकरण दिलं.