Raj and Uddhav Thackeray Hindi Teaching in Primary Schools : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (२६ जून) पत्रकार परिषद घेत ५ जुलै रोजी (आधी ६ जुलै ही तारीख जाहीर केली होती, जी काही वेळाने बदलण्यात आली) मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मोदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं आहे.