Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केलेले त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे व राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी घोषणा केलेला मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं दोन्ही पक्षांनी जाहीर केलं. त्यामुळे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर तूर्तास पडदा पडला आहे. हे सगळं करण्याची गरजच नव्हती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. सोमवारी (३० जून) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.