शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. प्रत्येकजण राजकीय अँगलने बघतो. उद्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यातून काही फायदा उठवता येईल का? विजयोत्सव साजरा केला तर त्यातून काही वातावरण निर्मिती होईल का? असा त्यांचा आराखडा असू शकतो, असं अजित पवार म्हणाले.