Pune Rape Case Ajit Pawar Reaction: कोंढवा बलात्कार प्रकरणाने मागील आठवडाभर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेवर, कायदा- सुव्यवस्थेवर, पोलिसांवर व अर्थातच सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते. मात्र या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक असं वळण आलेलं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सभेत माहिती दिल्यावर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा या प्रकरणातील घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. पुणे शहराची बदनामी करणारे हे खोटे नॅरेटिव्ह असल्याचं म्हणत अमितेश कुमार यांनी कोंढवा बलात्कार प्रकरणात पोलिसांनी २४ तासांत केलेल्या कामाचा उल्लेख केला आहे.