केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात गुजराती समाजाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय गुजरात’ असं म्हटले होतं. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. आता शिंदेंच्या याच विधानाचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी समर्थन केलं आहे. इतकचं नव्हे तर मुंबई ही गुजरातची देखील राजधानी होती, असं विधानही केलं. त्यावरून पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.