Vadodara Bridge Collapse News : गुजरातच्या बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्य़े बुधवारी पहाटे एक जीर्ण झालेला पूल कोसळला आहे. त्यामुळे अनेक वाहने महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत.