मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केलं. हे विधेयक सादर केल्यानंतर यावर विधानसभेत चर्चा झाली. चर्चेनंतर ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. याबद्दल प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की या विधेयकात ज्या तरतुदी आहेत त्याबद्दल शंका होत्या काही आहेत. याविषयी मुखमंत्र्यांनी त्यांची भूमिका आम्हाला समजावून सांगितली. तर या विधेयकामुळे डावे पक्ष, संघटना रडारवर येतील का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.