Sanjay Shirsat:सध्या मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विविध कारणांनी वादात अडकले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण केल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील पैशाच्या बॅगेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कथित पैशाच्या बॅगेप्रकरणी आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर भाष्य केले आहे.