सरकारने अधिवेशनात नुकतंच जनसुरक्षा विधेयक पारित केलं. मात्र हे विधेयक आणताना राज्यातील मंत्रीच सुरक्षित नाहीत, असा टोला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी लगावला आहे. आज विधानपरिषदेत बोलताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या कथित व्हिडीओचा विषय काढला. अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातला मंत्रीच सुरक्षित नाही. बेडरुममधला व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.