संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावल अक्कलकोट येथे शाईफेक करत हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवप्रतिष्ठांच्या सात कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जामीन पात्र असल्याने कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र आरोपीने पुन्हा एकदा असं कृत्य करू नये, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी दिली.