सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. जनसुरक्षा कायदा, अर्बन नक्षलवाद अमुक-तमुक या ज्या वल्गा करता आता अशा पोलीस अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना कोणता कायदा लावणार? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.