उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत बोलत असताना ठाकरे सरकारच्या काळात रखडलेली कामं, झालेले घोटाळे यावरून जोरदार हल्लाबोल चढवला. स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा एवढंच राबवायचं. खोटे-नाटे आरोप करणं सोडून द्या, विकासाला चालना द्या. आम्ही सरकारमध्ये येण्याआधी मुंबई, महाराष्ट्रात सगळे प्रकल्प ठप्प होते, असं शिंदे म्हणाले.