मुंबईला पूर्व आणि पश्चिम अशा दोन किनारपट्टी आहेत. आजवरचे म्हणजे तिसऱ्या शतकापासून आतापर्यंतचे मुंबईवरील सर्व हल्ले हे प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवर झाले आहेत. म्हणूनच इथे पश्चिम किनारपट्टीवर किल्ले बांधण्यात आले. यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे, तो वरळीचा.
वरळीच्या किल्ल्याच्या तटबंदीची भिंत ही उताराची आहे. ती सरळ का नाही, या प्रश्नाचे उत्तर बाजूला असलेला समुद्र हे आहे. समुद्राच्या लाटा वेगात उसळतात, त्यामुळे तटबंदीची भिंत कोसळू नये म्हणून लाटाचा वेग आणि परिणाम रोखण्यासाठी या किल्ल्याची तटबंदीची भिंत उताराची, तिरकी अशी करण्यात आली आहे. इथे आणखी एक अनोखी रचना पाहाता येते ती म्हणून किल्ल्याच्या आत प्रकाशासाठी एक खास सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आत प्रकाश पण शत्रूला दिसेल तो केवळ अंधार अशी रचना आहे. समजून घेऊया या किल्ल्याचे भूराजकीय महत्त्व आणि त्याची अंतर्गत खास रचना