Sushma Andhare: महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळताना दिसत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या या व्हिडीओवर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.